ब्रेकिंग : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे च पोलीसांकडून एन्काऊंटर
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बदलापूर येथी एक शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलीसांकडून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळी झडली. म्हणून पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी अक्षय शिंदे वर गोळी झाडल्याची माहिती मिळत आहे. अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना ही घटना तीन राऊंड झडले. आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आरोपी अक्षय शिंदे यका तळोदा येथून बदलापूर येथे आणत असताना अक्षय शिंदे ने पोलिस अधिकारी API निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून api निलेश मोरे वर गोळी झडली.
अक्षय शिंदेवर बदलापूर येथील शाळेत केलेल्या अत्याचाराशिवाय अन्य दोन बलात्काराचे गुन्हे होते. याबाबत कोर्टातून त्याची पोलिसांनी कस्टडी मिळवली होती. त्याला तुरुंगातून पुन्हा पोलीस कस्टडीत नेत असताना हा प्रकार घडला. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने त्याच्या शेजारी बसलेल्या अधिकाऱ्याची बंदुक हिसकाऊन घेतली. .
घटनेत पोलिस अधिकारी api निलेश मोरे जखमी झाल्याचे समजते. तळोजा तुरुंगातून त्याला बाहेर आणत असताना हा प्रकार घडला आहे. अक्षय शिंदेने तीन राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे.आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या. दरम्यान पोलिसांनी पैसे घेऊन हत्या केली असा आरोप अक्षय च्या कुटुंबियांकडून आरोप केला जातोय.