भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा, ” या ” जिल्ह्यात गारपीट

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| राज्यात काही जिल्ह्यांमध्ये दिवसा ढगाळ वातावरण तर दुपार उलटल्यानंतर वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस अन् गारपीट होत असून सोसाट्याचे वादळी वारे, विजांचा कडकटाट आणि अवकाळी पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे.हवामानात केव्हा कसा बदल होईल , कडक ऊन तर लागलीच पावसाची स्थिती अशी परिस्थिती निर्माण होते.

संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अलर्ट देण्यात आला आहे. तुमच्या जिल्ह्यात कस असणार हवामान, गारपीट होणार की मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाने काय इशारा दिलाय. हे जाणून घेऊ…

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकाच्या किनाऱ्यालगत बुधवार पर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंतया कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई, नवी मुंबई, उपनगर, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, नागपूर, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यात आज यलो अलर्ट हवामान विभागाने दिला असून पुढचे चार दिवस ही स्थिती कायम राहणार असून ताशी ४० किमी वेगाने वारे वाहणार असून सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, घाटमाथा, सांगली, सातारा, सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ६० किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!