शेअरमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे आमिष दाखवून सव्वादोन कोटींची फसवणूक, मोठे रॅकेट उघडकीस येणार?
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शेअरमध्ये मोठी रक्कम गुंतवणूक करून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यात तब्बल सव्वादोन कोटींची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना जळगाव सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने राजस्थानातून अटक केली आहे.यांच्या कडून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून त्यांचे साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
हे दोघे भामटे उच्चशिक्षीत प्राध्यापिका, डॉक्टर, शिक्षक व व्यावसायिकांना शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यात जादा नफा मिळेल, या आमिषाने गंडवल्यानंतर ही कारवाई जळगाव सायबर पोलिसांकडून करण्यात आली. या
टोळीतील क्रिप्टो करन्सी वॉलेट वापरणारा मोहम्मद इस्राइल याला दिल्लीतील कपासहेडा येथून तर बँकेचे करंट खाते कमिशनवर देणारा अनिल कुमार आणि याला बाडमेर (राजस्थान) येथून अटक करण्यात आली.
सायबर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, हवालदार प्रवीण वाघ, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, दीपक सोनवणे आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, आरोपींनी अन्य साथीदारांची नावे सांगितली असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.