क्राईममहाराष्ट्र

किराणा दुकानातून साडेचार कोटींचा ड्रग्सचा साठा जप्त

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचे ठिकाण म्हणजेच किरणा दुकान असते. किरणा दुकानातून रोज आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टी मिळतात. परंतु एका किरणा दुकानातून चक्क ड्रग्स चा मोठा साठा जप्त केलाय.पोलिसांनी राजेशकुमार प्रेमचंद तिवारी याला अटक केली आहे. नशेच्या बाजाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उल्हासनगरातील ग्रामीण भागामधील नेवाळी नाक्यावर राजेशकुमार तिवारी यांचे किराणा दुकान असून ते उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून त्याच्या दुकानात एमडी ड्रग्सचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दुकानावर छापा टाकून राजेशकुमार प्रेमचंद तिवारी याला अटक केली असून त्याच्या किरणा दुकानातून ४ कोटी ५० लाख ७० हजार रुपये किमतीची ३ किलो ६ ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर मिळून आली. हा एमडी ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच हा व्यवसाय कधी पासून सुरू आहे.या बाबतही शोध सुरू आहे.

तिवारीला हा ड्रग्सचा साठा शैलेश राकेश अहिरवार याने पुरवला होता. त्याच्याकडून मिळालेल्या अमली पदार्थाची तिवारी हा बेकायदेशीर रित्या किराणा दुकानातून विक्री करत होता. पोलिस शैलेश अहिरराव याचा शोध घेत असून यांच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाणार आहे. दरम्यान कल्याण गुन्हे अन्वेषणच्या कारवाईने नशेचा बाजाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!