अवैध गुटखा व तंबाखूजन्य पानमसाल्याची कार मधून तस्करी,कारसह गुटखा जप्त
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कारमधून अवैध गुटखा व तंबाखूजन्य पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या कारवर
कारवाई करत कार मधून कार सह २ लाख ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कार चालकावर अमळनेर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,मिळालेल्या माहिती वरून २१ एप्रिल रविवार रोजी संध्याकाळी सुमारे ४ ते ४ ३० वाजेच्या सुमारास अमळनेर पोलीसांनी एमएच १४ ईयू ५५६२ मधून अमळनेर शहरातील चोपडाई रोडवर कारची तपासणी केली असता कार मधुन अवैध गुटखा व तंबाखूजन्य पानमसाला आढळून आला. पोलिसांनी कारसह २ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून कार चालक अमोल अशोक पवार. वय ४१ वर्ष, रा. बोराडी, ता.शिरपूर, जिं.धुळे. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनरीक्षक अक्षदा इंगळे ह्या करीत आहेत.