जळगावप्रशासन

जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक बाजारात मतदार सुविधा केंद्र उभारणे सुरू

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l देशात सुरू असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी प्रत्येक बाजारात मतदार सुविधा कक्ष स्थापन केली जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा केंद्र उभारून मतदारांना मतदान विषयीक सर्व माहिती द्यायची आहे.

या मतदार सुविधा केंद्रावर मतदाना पूर्वी आपले मतदार यादीत नाव कसे बघायचे, स्लिप कशी काढायची, पुराव्यासाठी १२ पैकी कोणतेही एक असेल तर ते गृहीत धरले जाते. बाबतही त्यांना अवगत करून देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. असे सुविधा केंद्र ८ मे पर्यंत उभारले जाणार आहेत.

१३ मे रोजी जिल्ह्यात रावेर व जळगाव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या साठी जिल्ह्यातील प्रत्येक आठवडे बाजार असलेल्या गावी मतदार सुविधा कक्ष स्थापन करून त्याव्दारे बाजारात येणाऱ्या सर्व मतदारांना निवडणुक विषयक माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. त्यात मतदान केंद्राचा तपशिल, मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक शोधुन देणे तसेच त्यासाठी उपयुक्त असलेले वोटर हेल्पलाईन अँप बाबत मतदारांना माहिती देणे, मतदारांना मतदानासाठी आवश्यक असलेले १२ पुरावे कोण-कोणते आहेत त्याची माहिती देण्याबाबत जनजागृती करायची आहे. दरम्यान, पारोळा, जळगाव, चोपडा येथील रविवार आठवडे बाजारात सुविधा केंद्र उभारून मतदारांना सविस्तर माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!