भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगर

आदर्श इंग्लीश मिडियम स्कूल मुक्ताईनगर येथे विद्यार्थ्यांसाठी HIV जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

मुक्ताईनगर,मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | दि. १३ डिसेंबर — जागतिक एड्स सप्ताहाच्या अनुषंगाने नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टर व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, मुक्ताईनगर येथे HIV जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्लॅन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टरच्या वन स्टॉप सेंटरचे सेंटर मॅनेजर अल्केश वाघरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत HIV व AIDS मधील फरक सविस्तरपणे समजावून सांगितला.

तसेच HIV संसर्ग होण्याची चार प्रमुख कारणे, HIV बाबत असलेले गैरसमज व भीती यांचे निरसन करण्यात आले. यासोबतच STI (लैंगिक आजार) यांची माहिती देऊन त्यापासून बचावासाठी घ्यावयाची काळजी, लक्षणे व उपाययोजना तसेच दैनंदिन जीवनात वैयक्तिक तसेच परिसरातील स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. त्याचसोबत TB, Syphillis, HCV and HBV होण्यापासून बचाव करण्याकरिता आपण कोणती खरबदारी घ्यावी. तसेच कार्यक्रमात शासनाच्या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1097 विषयी माहिती देण्यात आली. तसेच यावर्षीच्या जागतिक एड्स दिनाच्या ब्रीदवाक्य —
“Overcoming Disruption, Transforming the AIDS Response”
(“अडथळ्यांवर विजय मिळवून, AIDS प्रतिसादाचे परिवर्तन”) यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वन स्टॉप सेंटरचे समुपदेशक मोहन महाजन यांनी विद्यार्थ्यांना Good Touch व Bad Touch या संकल्पना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समजावून सांगितल्या. तसेच सध्या मुलांमध्ये वाढत असलेल्या प्रसारमाध्यमांच्या गैरवापराचा त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी संदेशवहनामध्ये येणारे अडथळे खेळाच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांकडून HIV जनजागृतीची शपथ घेण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक नितीन पवार सर , मुख्याध्यापिका सरला पाटील मॅडम, मनीष चौधरी मॅडम, संजय राणे सर, भरत काळे सर, दिनेश शिवरामे सर, प्रफुल्ल मुंगे सर, राजेश सांगळकर सर, ॲडमिनिस्ट्रेटर लीना रडे, भारती सुरवाडे मॅडम, सविता महाजन मॅडम, लीना येवले मॅडम, ज्योती पाटील मॅडम यासोबतच विद्यार्थी तसेच व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!