प्रेमविवाह केल्याचा राग, पित्याचा गोळीबार, मुलीचा मृत्यू, जावई गंभीर, पित्याला पब्लिक मार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | प्रेमविवाह केल्याचा रागातून सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असलेल्या पित्याने चोपडा येथील आंबेडकर नगर येथे हळदीच्या कार्यक्रमात मुलगी व जावयावर गोळीबार गेला. यात मुलीचा मृत्यू झाला असून जावई गंभीर जखमी झाला आहे. तर उपस्थित नागरिकांनी गोळीबार करणाऱ्या मुलीच्या पित्याला पब्लिक मार दिल्यामुळे तो देखील गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसर हादरला आहे.
तृप्ती अविनाश वाघ (वय २५, रा.डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे) असे मयत तरुण विवाहितेचे नाव आहे. तर तिचे पती अविनाश ईश्वर वाघ (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहेत.
प्रेम प्रकरणा रागातुन सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने हळदीच्या कार्यक्रमात आलेली मुलगी व तिचा पती यांच्यावर गोळीबार केला आहे.यात मुलगी तृप्ती अविनाश वाघ (वय २४ ) हिचा मृत्यू झाला असून तिचा पती अविनाश ईश्वर वाघ ( वय २८ ,दोघे रा करवंद, शिरपूर, ह मु कोथरूड पुणे) याला पोटात गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना चोपडा शहरातील आंबेडकर नगर, खाई वाडा जवळ येथे रात्री १० वाजेला घडली. यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी अविनाश व तृप्ती यांचा प्रेम विवाह झाला होता. यातच अविनाश याच्या बहिणीची हळद दि २६ रोजी चोपडा शहरातील खाई वाडा जवळील आंबेडकर नगर येथे होती. त्यानिमित्ताने ते चोपडा येथे आले होते. त्यात तृप्तीने प्रेम विवाह केला याचा राग वडील निवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण अर्जुन मंगले यांच्या मनात होता.( वय ४८,रा शिरपूर जि धुळे ) ते चोपडा येथे हळदीच्या ठिकाणी आले.त्यात त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर व तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. यात मुलगी तृप्ती ठार झाली तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे उपस्थित वऱ्हाडीना राग येऊन गोळीबार करणाऱ्या किरण मंगले याला पब्लिक मार दिला यात तो गंभीर जखमी झाला आहे.पुढील उपचारासाठी जावाई अविनाश व सासरा किरण मंगले यांना जळगाव हलविण्यात आले आहे. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब घोलप,पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे उपस्थित होते यावेळी नातेवाईकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रियंका ईश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी किरण अर्जुन मंगळे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा निखिल किरण मंगळे (वय २२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी अण्णासाहेब घोलप यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे करीत आहेत.