यावलसामाजिक

अर्थसंकल्पात मेगा रिचार्जला मंजुरी : कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेचे स्वप्न साकारण्याकडे यशस्वी पाऊल

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी विकसित महाराष्ट्राच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. आदरणीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात हा अत्यंत परिणामकारक अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

या अर्थसंकल्पात मेगा रिचार्ज प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा उल्लेख झाला आहे, जो कृषीमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीकडे एक मोठे यशस्वी पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मनःपूर्वक धन्यवाद!

विशेषतः या यशामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय गिरीशभाऊ, आदरणीय रक्षाताई , आदरणीय गुलाबभाऊ, आदरणीय संजयभाऊ आणि जिल्ह्यातील सर्व आमदार महोदयांचे देखील आमदार अमोल जावळे यांनी मनःपूर्वक आभार मानले!

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!