संजय राऊत यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने जामीनपत्र अटक वॉरंट जारी केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांना मोठा झटका मानला जात आहे.
- ब्रेकिंग : जळगाव जिल्हा परिषदेचा अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात, जिल्हा परिषदेत खळबळ !
- रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू असलेल्या अल्पवयीन तरुणीवर पोलिसाचा अत्याचार
- “तु मला आवडतेस … ” महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करताना मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. त्यांच्या याच आरोपांप्रकरणी सोमय्या कोर्टात गेल्याची माहिती समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी राऊत यांना याप्रकरणी मोठा झटका बसणार असल्याचा इशारा दिला होता. अखेर कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांनी वारंवार आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मुद्दा मांडला होता. त्यानंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. संबंधित आरोपांप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. त्यानंतर शिवडी कोर्टाकडून राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.