सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; एकनाथराव खडसे
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : मुक्ताईनगरात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेच्या बत्तीसाव्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खु, हरताळा येथे माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद सभा संपन्न झाली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष, माफदा राज्याध्यक्ष विनोद तराळ ,यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, बंगालीसिंग चितोडीया, तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, माजी सभापती विलास धायडे, प्रदिप साळुंखे, समाधान कार्ले, यात्रा सह प्रमुख रामभाऊ पाटील, अतुल पाटील, जि प सदस्य निलेश पाटील, रामदास पाटील, नंदकिशोर हिरोळे, लता सावकारे, विजय चौधरी, विकास पाटील, श्रीराम चौधरी,बाळा भालशंकर, बबलू सापधरे, राजेश चौधरी, रविंद्र पाटील, सोनु पाटील, विनोद कोळी, राहुल पाटील, वसंत पाटील, विशाल रोटे, अजय तळेले, दिपक चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी
एकनाथराव खडसे म्हणाले, गेले तिस वर्ष मतदारांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तिस वर्षात सर्व जाती धर्माला घेऊन सर्वसमावेशक विकासाचे राजकारण केले विकास कामे करताना कुठलाही भेदभाव केला नाही आताचे आमदार विकास कामांना स्थगिती देतात स्थगिती देण्यापेक्षा आम्ही आणलेल्या विकास निधी पेक्षा दुपटीने विकास निधी आणा स्थगिती देण्यापेक्षा विकास कामांची स्पर्धा करा
राजकारण करताना कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही परंतु आजकाल चे राजकारण बदलले आहे सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत यातूनच मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारे यांची सभा होऊ दिली नाही
सत्ताधाऱ्यांनी अशाप्रकारे सभा रद्द करून विरोधकांचा आवाज दाबण्यापेक्षा सुषमा अंधारे यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती मतदारसंघात अनेक विकास कामे केली राहिलेली विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यासाठी आतापर्यंत जशी साथ दिली ती साथ कायम राहू द्या असे त्यांनी आवाहन केले
ग्रामस्थां सोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या
गेल्या विधानसभा निवडणुकीत थोडया मतांनी माझा पराभव झाला परंतु ज्या नव्वद हजार मतदारांनी मला मतदान केले त्यांची भेट घेण्यासाठी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी निमखेडी खु येथिल गंभीर घोगरे, बाबुराव शिर्के, रविंद्र पाटील, सुशिल साळुंखे, रविंद्र बेलदार,अभिमन्यु घोगरे,योगेश व्यवहारे, आनंदा पाटील, संदिप घोगरे, बाबुलाल बोराळे,प्रताप डहाके,देवलाल डहाके,अनिल मगर, दिनकर सुरवाडे, हरताळा येथील सरपंच दिपक कोळी, शे रहेमान शे उस्मान, किसनराव चव्हाण,महेश शेळके, बाळू भाऊ पाटील, गोपाळ उदळकर, पांडुरंग शेळके, दिलीप तायडे,वसीम खान शब्बीर खान,हमीद खान, मोहसीन खान, धिरज मुलांडे, अरुण सपकाळ, भोपे सर, रशिद खान, रामभाऊ निकम, प्रविण सपकाळ, शाकिर मण्यार, किसन धनगर, कादर खान आणि ग्रामस्थ उपस्थित होते