यावल तालुक्यातील ४९ वर्षीय इसमाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |एका ४९ वर्षीय इसमाचा शेत विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील चिंचोली येथे शेत शिवारामध्ये घडली.
यावल तालुक्यातील चिंचोली गावातील रहिवासी सुरेंद्र रामलाल बाविस्कर. वय ४९ वर्ष. हे गावालगत असलेल्या शेतात गेले असता शेत विहिरीत त्याचा पाय घसरला आणि ते विहिरीच्या पाण्यात बुडाले.
त्यांना तातडीने विहिरीतून काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.

