सालीला घेऊन नवरा फरार, बायको उपाशी,नवरा तुपाशी
औरंगाबाद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नवऱ्याने चक्क सासरवाडीहूनच पत्नीच्या अल्पवयीन बहिणीला म्हणजेच मेहुणीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडल्याने
सासरवाडीची मंडळी मात्र मोठी हैराण झाली.
दीड वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर जावयाचे सासरी नेहमी येणे जाणे रहायचे, तेव्हा अल्पवयीन सलीशी म्हणजेच बायको च्या लहान बहिणीशी नेहमीच गुप्तांगु रहायचे, सासरवाडीच्या लोकांना वाटत होतं साली आहे, तर बोलणं चालणं चालूच राहणार,सलीही मेहुण्यांशी विश्वासाने बोलत असे ,सलीला काय माहिती की आपला हा चालू मेहुणा आपल्यालाच पळून नेईल ,आणि घडले तसेच,जावई ९ मे ला सासुरवाडीला मुक्कामीच आला,जावया सह सर्वच जण रात्री जेवण करून झोपून गेले ,सकाळी उठल्यावर जावयासह सतरा वर्षाची मुलगी ही गायब होती,त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता कुठेही मिळून न आल्याने सासरवाडीचे सर्व लोक चिंतेत पडले.
शेवटी दुसऱ्या दिवशी १० मे रोजी जावयाचा मित्राच्या फोनवरून फोन आला की,मी तुमच्या मुलीला रात्रीच १२ वाजता पुण्यातील चाकण येथे घेऊन आलो आहे तिला परत आणण्या साठी माझ्या मित्राच्या फोन पे वर १०,००० रुपये पाठवा,सासरा फारच गरीब असल्याने त्याने दुसऱ्यांकडून उधार उसनवारी करून कसेतरी ७,५०० रुपये जमवून फोन पे वर पाठविले ,त्या नंतर सासऱ्याने जावयाला वारंवार फोन केले परंतु तरीही जावई मुलीला आणायला तयार होईना , मुलीची वाट पाहून कुटुंब रडकुंडीस आले ,तरीही जावई मुलीला आणून सोडायला तयार नव्हता,जावयाच्या वडिलांकडे सुद्धा या बाबाबत माहिती दिली तरीही काही उपयोग झाला नाही शेवटी सासऱ्याने सासू सह पोलिसस्टेशन गाठत फिर्याद दाखल केली , ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तलीक्यातील धोंदलगाव येथील असून मुलगा कापुसवाडगाव येथील आहे, या बाबत वैजापूर पोलिसस्टेशनला जावई, त्याचे वडील व त्याचा मित्र या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.