भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, औरंगाबाद सभेवरुन पोलिसांची कारवाई

औरंगाबाद, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस स्थानकात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंना अटक करण्याची शक्यता मनसे नेत्यांनी वर्तवली असून राजकारणाचा पारा चढला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. 1 मे 2022 रोजी राज ठाकरेंनी औरंगाबमध्ये सभा घेतली होती. औरंगाबादच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी अटी घातल्या होत्या एकूण 16 अटींपैकी 12 अटींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. राज ठाकरेंच्या भाषणाची औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता पडताळणी करत होते. कायदेशीर भाग तपासल्यानंतर राज ठाकरेंवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जुन्या प्रकरणांमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना देखील नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

राज ठाकरेंच्या सभेनंतर पोलिसांनी सर्व डेटा गोळा केला. सभेच्या ठिकाणी पोलिसांकडूनही सीसीटीव्ही लावण्यात आले होते. या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्त आज राज ठाकरेंवर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंवर कलम 116,117,153 ए,135 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबाद मनसे जिल्हा अध्यक्ष सुमित खांबे यांच्यावरसुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे. सभेच्या आयोजकांवरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित खांबे यांच्या घरी पोलिसांचे पथक दाखल झाले होते. त्यांना कारवाईची नोटीस पोलिसांनी दिली आहे. मनसैनिकांनी पोलिसांच्या नोटीसीचे स्वागत केल असल्याची प्रतिक्रिया मनसैनिकांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!