भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा : प्लॉट एन.ए. करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच मागणाऱ्या भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील महिला अव्वल कारकून प्रतिभार मच्छिंद्र लोहार (वय-४०) यांना नंदूरबार लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडल्याने प्रांताधिकारी कार्यालयातील वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, भुसावळ शहरातील एका तक्रारदाराने प्लॉट एन.ए. करण्यासाठी भुसावळ प्रांत कार्यालयात त्यांनी सादर केले होते. संशयित आरोपी अव्वल कारकून प्रतिभार मच्छिंद्र लोहार (वय-४०) यांनी कामाच्या मोबदल्यात १० हजार रूपयांची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी थेट नंदूरबार लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार १७ सप्टेंबर २०२१ रोजी सापळा रचला असतांना लोहार यांना संशय आला. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारली नाही. परंतू लाच मागितल्याचे सिध्द झाले होते. त्यानुनसार त्यांना आज मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी नंदूरबार पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.  ही कारवाई नंदुरबार एसीबीच्या निरीक्षक माधवी वाघ व पथकांने केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!