भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जळगाव मध्ये कुंटणखान्यावर छापा, तीन महिलांची सुटका

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शहरातील खेडी परिसरातील एक कॉलेज जवळ एक महिला अवैधपणे कुंटणखाना चालवत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या नुसार त्या कुंटणखान्यावर शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून तीन महिलांची सुटका केली. असून दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यात एका संशयित महिलेचा समावेश आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील खेडी परिसरातील एका कॉलेज जवळ एक महिला काही महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणले असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली. या ठिकाणी कुंटणखाना सुरू असल्याची परिसरातील नागरिकांनी तक्रार देखील केली होती. त्यानुसार त्यांनी पोलिस पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्या नुसार शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी ४ वाजता या ठिकाणी सापळा रचून डमी गिऱ्हाईक पाठवून खात्री केली. खात्री झाल्याने पोलिसांनी लागलीच छापा टाकला. या कारवाईत कुंटणखाना चालणाऱ्या दांपत्यासह एक असे ३ जणांना ताब्यात घेतले. त्यातील तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आणि या ठिकाणी असलेले गिऱ्हाईक म्हणून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

यामध्ये एकूण पाच संशयित आरोपी असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे या संदर्भात शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, इंदल जाधव, पो कॉ विक्की इंगळे, अमोल वंजारी, अनिल कांबळे, निलेश घुगे, काजल सोनवणे यांनी कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!