बातमी छापल्याने पत्रकाराला अश्लील शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी! पोलिस तक्रारी साठी करावं लागलं उपोषण
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बुलढाणा,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पत्रकाराला बातमी छापली म्हणून धमकावण्यात येऊन अश्लील शिविगाळही करण्यात आली . महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात हा प्रकार घडला आहे. खामगावच्या पाणीपुरवठा अभियंत्यावर पत्रकाराला धमकावण्याचा आणि त्याला शिविगाळ करण्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी पोलिस तक्रार दिल्यानंतर संबंधित अभियंत्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुरुवातीला तक्रार देऊनही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे ज्या पत्रकाराला शिविगाळ करण्यात आली, त्यानं पाच दिवस उपोषण केलं होतं. यानंतर स्थानिक पत्रकारांनी एकत्र येत या संपूर्ण प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत अखेर गुन्हा दाखल केला आहे.
काय होती नेमकी बातमी..?
बुलढाणा निळ्यातील खामगावात पत्रकार आकाश पाटील यांनी आपल्या वृत्तपत्रात एक बातमी छापली. ग्रामीण पाणीपुरवठा योजना, खामगाव, या संदर्भात ही बातमी होती. या बातमीवर जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता चिडले. अभियंता व्ही एम चव्हाण आणि जाधव नावाच्या कर्मचाऱ्यांनी फोनकरुन पत्रकार आकाश पाटील यांना शिवीगाळ केली. तसंच त्यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली.
संबंधित बातमी हे ही वाचा : मुक्ताईनगरात अवैध धंद्यांची बातमी लावल्याने सूड घेण्यासाठी सट्टा माफियांकडूम पत्रकारांवर जीवघेणा हल्ला !
पोलिस तक्रारी साठी करावं लागलं उपोषण
दरम्यान पोलीस तक्रार देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात होता. म्हणून पत्रकार आकाश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या कार्यालयासमोर पाच दिवस उपोषण केलं. त्यानंतर जिल्ह्यातील पत्रकारांनी आंदोलनाचा इशारा दिला. अखेर पोलीस प्रशासनानं नमतं घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करुन घेतलाय.