मुक्ताईनगरात अवैध धंद्यांची बातमी लावल्याने सूड घेण्यासाठी सट्टा माफियांकडूम पत्रकारांवर जीवघेणा हल्ला !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : प्रसारमाध्यमांमध्ये अवैध धंद्यांच्या संदर्भात बातम्या लागल्याने अवैध धंद्यांना संदर्भात आवाज उठवल्याने त्याचा राग येऊन त्यांचा सूड घेण्यासाठी व यापुढे आपल्या विरोधात बोलू किंवा आवाज उचलू नये या हेतूने वृत्तसंकलन करून परतत असलेल्या मुक्ताईनगरातील पत्रकारांवर सट्टा मटका माफिय अवैध धंद्यांवाल्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून पत्रकारांच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन दिवस आधी मुक्ताईनगर शहरातील पत्रकारानी प्रवर्तन चौकात चालणाऱ्या अवैध धंदे म्हणजे सट्टा मटक्याचे केंद्र असलेल्या सट्टा माफिया संदर्भात बातम्या लावल्या होत्या यानंतर मुक्ताईनगर पोलिसांकडून सट्टा माफियांची धरपकड करण्यात आली होती. त्याचा राग आल्याने चवताळलेल्या गुंडांनी आश्याप्रकरे त्यांचा सूड घेतला जाईल, यापुढे आमच्या विरोधात बोलू किंवा आवाज उचलू नये असे सट्टा माफियांकडून अवैध धंदे चालकांकडून पत्रकारांच्या मोटरसायकलवर दगडफेक करण्यात येऊन गाडीचे नुकसान करण्यात आले तसेच पत्रकारांना सुद्धा काठ्यांनी मारहाण झाली आणि तुम्ही आमच्या विरोधात बातम्या लावल्यामुळे तुम्हाला जीवे ठार मारण्यात येईल किंवा पैसे देऊन तुम्हाला मारहाण केली जाईल असा पद्धतशीर धमकी एकामार्फत पत्रकारांना पाठविण्यात आली होती.
त्यानुसार लगेच संध्याकाळी पत्रकार बातमीचे वृत्तसंकलन घेण्यासाठी गेले असता हॉटेल यादगार जवळ अंधाराचा फायदा घेत दोन युवकांनी मोटरसायकलवर येऊन साहसिक न्युजचे पत्रकार पंकज तायडे यांच्या मोटरसायकलीच्या समोरील काच, इंडिकेटर तोडून नुकसान केले तसेच लाईव्ह ट्रेंड्स न्युजचे पत्रकार पंकज कपले यांच्या पायावर काठीने मारहाण व मंडे टू मंडे वृत्तपत्राचे प्रतिनिधी अक्षय काठोके यांना हातांवर मार लागला आहे, याबाबतची फिर्याद पत्रकार अक्षय काठोके यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे दिली असून अज्ञांता विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात कलम 323, 427 प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांवर हल्ले होत असतील तर अवैध धंद्या वाल्याना कायद्याचा धाक उरलेला नसून यांच्यावर महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था अधिनियम २०१७ चे पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात यावी. यासंदर्भात जिल्ह्यातील पत्रकार ठिकठिकाणी निवेदन देत निषेध करणार आहे. याघटनेचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक शंकर शेळके करीत आहे परंतु अशा घटनांमुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना वृत्तसंकलन करणे कठीण होऊन जाईल त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे असा सूर जनमानसात उमटत आहे.
पत्रकारांवरील हल्ले ही भारत देशात घडलेली नवीन गोष्ट नाहीये. पण लोकांचा आवाज असणाऱ्या पत्रकारांना, अशा पद्धतीने दाबण्याचा पत्रकारिता स्वातंत्रावर गदा आणण्याचा प्रयन्त होत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका ती काय ! पत्रकाराला जर जीवघेणा हल्ला करण्याचा व जीवे मारण्याच्या धमक्या देत प्राणघातक हल्ला करण्यात येत असेल असा अन्याया विरोधात जनतेचा आवाज बनणाऱ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार सुरक्षित नसेल तर तेथील कायदा व सुव्यवस्था यावर सामान्य नागरिकांनी कितपत विश्वास ठेवावा? अशा संतप्त प्रतिक्रिया या हल्याने नागरिकांमध्ये उमटत असून आरोपींना तात्काळ शोध घेत अटक करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन पत्रकारांकडून करण्यात येत याची प्रशासनाने नोंद घ्यावी.