भुसावळ दुहेरी हत्याकांड : आरोपींवर मोक्का कारवाई, अन्य गुन्हेगारांवरही मोक्का कारवाईने खळबळ
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यासह राज्याला हादरा देणार्या भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपींवर आता मोक्का कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.या सोबत गुन्हेगारी श्रेत्रातील इतरही गुन्हेगारांवर अशीच कारवाई केली जाणार असल्याने गुन्हेगारी श्रे खळबळ उडाली आहे.
भुसावळ येथील माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची शहरातील मरिमाता मंदिर परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी भुसावळ येथील माजी नगरसेवक राजू भागवत सुर्यवंशी, बंटी पथरोड, विष्णू पथरोड, शिव पथरोड, विनोद चावरिया, सोनू पंडित, करण पथरोेड, नितीन पथरोड आणि अन्य तीन जण अशा एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर हत्याकांड पाहता शहरातील कायदा सुव्यवस्था लक्षात घेता सदर संशयित आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने तयार केला असून तो नाशिक येथील पोलीस महानिरिक्षकांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.गुन्हेगारीवर वाचक रहावा म्हणून या सोबत गुन्हेगारी क्षेत्रातल्या काही अन्य गुन्हेगारांवरही याच प्रकारची कारवाई करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाने सुरू केल्या असल्याचे सांगितले गेले.