संतापजनक : भुसावळात नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सख्या पित्याकडून गेल्या तीन वर्षांपासून अत्याचार करण्यात येत असल्याची केल्याची संतापजनक घटना उघडकीला आली असून याप्रकरणी पिता-पूत्रीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या नराधम पित्यास अटक करण्यात आली असून भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बाजारपेठ पोलीसाच्या माहितीनुसार, शहरातील एका भागात पीडीता आपल्या वडिल व आत्या व भावासह राहते. पीडीतेच्या आईचे 13 वर्षांपूर्वीच निधन झाल्याने आत्यानेच पीडीतेचा सांभाळ केला. दरम्यान, संशयीत आरोपी तथा नात्याने पीडीतेच्या 41 वर्षीय पित्याने शनिवार, 23 रोजी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान पीडीतेवर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने पीडीतेने विरोध करीत बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले व पोलिसांकडे अत्याचाराची कैफियत मांडली. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पीडीतेचे म्हणणे ऐकून घेत तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला शनिवारी अटक केली. पीडीतेच्या तक्रारीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून नराधम पित्याकडून अत्याचाराचा प्रकार सुरू होता शिवाय घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीविरोधात भुसावळ बाजार पेठ पोलिसात भाग 5, गुरनं भादविं कलम 376 (3), 506 व बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 चे कलम-6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.