भुसावळ गांधी पुतळा चौकात वाहतूक पोलिसांकडून वाहनधारकांची आर्थिक लूट
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शहरातील मोक्याच्या ठिकाणी म्हणजेच फैजपूर जळगाव रोड वरील भुसावळ कोर्ट परिसरातील गांधी पुतळा चौकात वाहनधारकां लक्षात येईल अशा प्रकारे फोटो काढत असल्याचे दाखवत येन- तेन प्रकारे अडवून गाडीचा फोटो काढण्याचा धाक दाखवत दंडाच्या नावाखाली येथील वाहतूक पोलीस आर्थिक लुट करत असून वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी म्हणजे सरकारच्या आणि संबंधित विभागाच्या अलिखीत परवानगीने चालणारे ‘चालते बोलते’ टोलनाके असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यामुळे वाहन धारकांनमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
- रावेर मधून महायुतीचे अमोल जावळे ४३ हजारांच्या वर मतांनी विजयी
- मोठी ब्रेकिंग : रावेर मधून अमोल जावळे पाच हजाराने पुढे
- ब्रेकिंग : ३० हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उप निरीक्षक जाळ्यात, फैजपूर मध्ये गुन्हा दाखल
येथून ये-जा करणाऱ्या मोटरसायकल स्वांराना, शाळकरी मुलांना मुद्दाम वाहनधारकां लक्षात येईल अशा प्रकारे फोटो काढत असल्याचे दाखवत थांबवून मोबाईल मशीन मध्ये फोटो काढण्याचा धाक दाखवत पैसे घेतले जात असून वाहने अडवून, सक्तीने पैसे वसूल करण्याचा उद्योग राजरोस सुरू असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. परिसरात वाहतूक पोलिस पोलीस वाहनासहित उभे असल्याचे आढळून येतात. विशेष म्हणजे येथून ये-जा करणाऱ्या मध्यप्रदेशसह राज्यातील, बाहेरच्या मालवाहू अवजड वाहनांना अडविण्याचे काम सहकाऱ्यांकडे दिलेले असते. प्रसादरुपी हफ्त्याची रक्कम गोळा करण्यासाठीही व्यवस्था इथे चोख पार पाडली जाते.
त्यात दररोज धावणाऱ्या भुसावळ ते फैजपूर – सावदा – रावेर प्रवाशी रिक्षा चालकांचे ठरलेले हप्ता महिना झाला की रिक्षा चालकांना पोलिसांपर्यंत हप्ता पोहच करावा लागत असल्याचे परिसरात नेहमीच बोलले जाते त्यात कुठलाच खंड पडल्याचे दिसत नाही म्हणजे आजतागायत तो यंत्रणा तशीच अभेद्य आहे असे म्हणने वावगे ठरले तर नवलच की…! या ठिकाणापासून पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे शहरात डीवायएसपी ऑफिस आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना यांची कल्पना नसणे म्हणजे नवलच किंवा मुद्दाम कानाडोळा केला जात असावा ? हा सर्व प्रकार जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती असून ते याकडे कानाडोळ करत असल्याचे बोलले जात आहे. आता अशा गंभीर प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे हे लक्ष घालून संबंधित कर्मचाऱ्यांवर अंकुश लावतील का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.