क्राईमभुसावळ

प्राचार्या सह अकाऊंटन्टला ९ हजाराची रंगेहात लाच घेताना सीबीआय कडून अटक

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लॉक बुकवर सही करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या भुसावळ रेल्वे विभागातील झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंटर अर्थात झेडआरटीसी प्राचार्य सुरेशचंद्र जैन व अकाउंटंट योगेश देशमुख या दोघांना लाच स्वीकारताना पुण्याच्या सीबीआय पथकाने रंगेहाथ पकडुन अटक केली.या घटनेमुळे रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंटर जेटीसी येथे ठेकेदारी पद्धतीने अक्षय चौधरी यांनी चारचाकी वाहन भाडे तत्त्वावर दिले होते. त्यांच्या चारचाकी वाहनाचा टेंडर संपला असताना त्या संदर्भात लॉकबुक व सही करण्यासाठी अकाउंटंट योगेश देशमुख यांच्याकडे गेले असता त्या मोबदल्यात देशमुख यांनी अक्षय चौधरी यांना ९ हजार रुपयांची मागणी केली. चौधरी यांनी मागितलेली लाच देशमुख यांना दिली, बुधवार ६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सदरील लाचेची रक्कम अकाऊंटन्ट योगेश देशमुख यांनी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंटरचे प्राचार्य सुरेशचंद्र जैन यांना देताना पुण्याच्या सीबीआय पथकाने रंगेहात पकडले. सीबीआय पथकाचे अधिकारी महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली सदरचा सापळा रचण्यात येऊन लाच स्वीकारणाऱ्या दोघांचे बोटांचे ठसे नोटांवर आढळून आले. महेश चव्हाण यांचे सीबीआय पथकाचा ताफा प्राचार्य सुरेशचंद्र जैन यांच्या कार्यालयामध्ये व अकाऊंटन्ट योगेश देशमुख यांच्या बंगल्यावर उशिरा पर्यंत कारवाई सुरू होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!