भुसावळ

आयशर ट्रक उलटून भुसावळ येथील ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एम एच १९ सी वाय ९८३९ ही आयशर ट्रक अकोला येथून माल खाली करून भुसावळ येथे येत असताना भुसावळ जवळील साकरी या गावाजवळ बंद असलेल्या टोल नाक्याजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक उलटून त्यात चालक सुनील जगन्नाथ पाटील वय ४५ वर्ष ,श्रीराम नगर भुसावळ, याचा जागीच मृत्यू झाला .ही घटना रविवार संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

अपघातग्रस्त वाहन स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने दाबलेला मृतदेह क्रेन द्वारे बाजूला करून काढण्यात आला, सुनील याचा मृतदेह ट्रॉमा केअर सेंटर मध्ये नेण्यात आला. घटनास्थळी भुसावळ तालुका पोलिसस्टेशनचे सपोनी विशाल पाटील,बाजारपेठ पोलिस स्टेशनचे राजू सांगळे व सहकारी दाखल झाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!