भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळात अवैध गुटका विक्रेत्यांला अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ (प्रतिनिधी)। शहरातील जामनेर रोडवरील बद्री प्लॉट मधील किराणा दुकानात विमल गुटख्याची अवैध विक्री प्रकरणी दुकानदारस अटक करण्यात आली आहे.

शहरातील जामनेर रोडवरील बद्री प्लॉट मधील पूजा प्रोव्हिजन या किराणा दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व सुगंधी पान मसाला विमल गुटख्याची अवैध विक्री सुरू असल्याचे गुप्त माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना मिळल्यावरून दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व सपोनि मंगेश गोंटला यांच्या पथकाने धाड टाकत आरोपीकडून २२ हजार ३१५ रुपयांचा विमल गुटखा जप्त करत आरोपी विनोद सुधाकर भारंबे वय ४७ याला अटक करण्यात आली आहे फिर्यादी पोकॉ प्रशांत दिनेश परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ००७८/२०२१ भादवी कलम ३२८,१८८,२७२,२७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!