क्राईमभुसावळ

भुसावळ मधून ७६ लाखाचा मेथाक्वालोन ड्रग्ज जप्त

भुसावळ,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सुमारे ७५ लाख ८० हजारांचा मेथाक्वालेन ड्रग्ज भुसावळ शहरातील हॉटेल मधुबन परिसरात घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून या सह दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. येवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पोलिसांनी जप्त केल्याने भुसावळ शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल मधुबन परिसरात काहीजण ड्रग्ज मोठा साठा घेवून जात असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली असता मंगळवारी १९ मार्च रोजी रात्री ११ वाजता विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघम यांच्यासह पथकाने कारवाई करत संशयित आरोपी कुणाल भरत तिवारी रा. तापी नगर. भुसावळ आणि जोसेफ जॉन वाडाल्यारेस रा. कंटेन यार्ड, भुसावळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७५ लाख ८० हजारांचा ९१० ग्रॅम मेथाक्वालोन ड्रग्ज आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

नाशिक येथे मेथाक्वालोन नावाच्या ड्रग्ज चा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी चाळीसगाव व नाशिक यांचे कनेक्शन जोडले गेलेले होते.यात भुसावळचाही समावेश होता.

याप्रकरणी पो.कॉ. प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय मंगेश जाधव करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!