भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

दोन पोलीस निलंबित, त्यातील ऐकला अटक, काय आहे कारण?

भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ८ लाखांची महागडी पॉवर केबल रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून चोरी प्रकरणी भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. यात एका पोलिसाला अटक आहे. एकूण चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

७ लाख ९४ हजार २२७ रुपये किंमतीची १६०४ किलो पॉवर केबल भुसावळातील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून चोरीला गेल्याचा प्रकार १६ डिसेंबरला उघडकीस आला होता. याप्रकरणी संशयित सचिन उत्तम तायडे , वय -२५, राहुल रतन मोरे वय.२३, दोघे रा. महादेव टेकडी, कंडारी, ता.भुसावळ, व आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (५७, स्वामी विहार, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. संशयिताना भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता २४ पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली.

तीन्ही अटकेत असलेल्या आरोपींचा जवाब नोंदवल्यानंतर त्यात पुन्हा एका आरोपीचे नाव समोर आल्याने त्यास अटक करण्यात आली. कुणाल लक्ष्मण मोरे (१९, महादेव मंदिराजवळ, कंडारी, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, केबल चोरीनंतर ती विकून आलेल्या रकमेतील अर्धा हिस्सा हवालदार शशिकांत सुरवाडे याने ठेवल्याने त्यासदेखील या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले होते तर संशयिताला रेल्वे सुरक्षा बलाच्या आयुक्तांनी निलंबित केले आहे. त्याच्यासोबत कर्तव्यावर असलेल्या यादव नामक कॉन्स्टेबललाही निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!