भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

ब्रेकिंग : महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपात झाल्याचा संशय

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून तालुक्यातील अतीदुर्गम आदीवासी भागात एका अनोळखी ३० ते ४० वर्षीय महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने घातपाताची शक्यता व्यक्त केली जात असून या घटनेसंदर्भात यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील गाड्र्या – जामन्या या अतिदुर्गम भागात निळकंठ कुटियाजवळ कोरडा तलाव असून या परिसरातून वनविभागाचे कर्मचारी १४ एप्रिल सोमवार रोजी दुपारच्या सुमारास जात असतांना त्यांना तलावात अंदाजे ३० ते ४० वर्षीय महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.

या घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाची व इतर कारवाई सुरू केली. यासंदर्भात यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.नि.प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत. दरम्यान

दरम्यान या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नसली तरी प्राथमिक माहितीनुसार महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!