भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

१० हजारांची लाच भोवली : पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबला एसीबीकडून अटक !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

वरणगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथील पोलीस स्टेशन हद्दीत वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई न करण्याच्या बदल्यात १० हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबला जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वरणगाव पोलीस हद्दीत वाळूची वाहतूक करण्यासाठी वाळू वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्यान कडून पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी वय-५६ (रा. भिरूड कॉलनी,जळगाव) व गणेश महादेव शेळके वय-३१ (रा.पोलीस वसाहत वरणगाव) यांनी कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पोउनि सुनिल वाणी यांनी १० हजाराची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार वाळू व्यावसायिक यांनी अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार जळगाव एसीबीचे नूतन पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्‍यांनी सापळा रचून आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास गणेश शेळके हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदारकडून १० हजार रूपयांची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक करण्यात आली असून दोघे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!