भुसावळात चाकू, तलवारी, रायफल, बंदूकासह मोठा शस्त्रसाठा जप्त !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा| शहरातील बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात मुस्लीम कॉलनी परिसरात चाकू, तलवारी, रायफल, बंदूकासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांना साठा जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी, पोलिसांकडून वरिष्ठ पातळीवर शहरातील संशयास्पद पार्श्वभूमि असणार्या लोकांच्या घराची झडती घेण्याची परवानी मागण्यात आली होती. याबाबत परवानगी मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलीस स्थानकाची दोन पथके तयार करण्यात आली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक दिलीप भागवत, सपोनि अनिल मोरे, पोहेकॉ जयराम मोरे, नेव्हील बाटली, रवींद्र बिर्हाडे, कृष्णा देशमुख, समाधान पाटील, प्रशांत सोनार, मीना कोळी, जयेंद्र पगारे यांच्या पथकांनी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असणार्या घरांमध्ये छापेमारी केली. या कारवाईत मुस्लीम कॉलनी भागातील ईदगाह समोर राहणारा शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख यांच्याकडे मोठा शास्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली. याची खातरजमा करून पथकाने छापा मारला असता शेख याच्या घराजवळच्या शेडमध्ये चार तलवारी, चार चाकू, दोन बंदूक, एक रायफल आदींचा मोठा साठा मिळाला. पोलीस पथकाने हा साठा जप्त केला आहे.
बाजारपेठ पोलीस स्थानकात या प्रकरणी गुरनं ३४२/२०२१ अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून शेख पप्पू उर्फ शिकारी अब्बास शेख आणि त्याचा मुलगा रिझवान पप्पू शेख हे दोन्ही आरोपी फरार झाले असून पुढील तपास डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरिक्षक दिलीप भावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जयेंद्र पगारे हे करीत आहेत.