भुसावल तालुक्यात तरुणाची हत्या, तिघा संशयितांना अटक
भुसावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। तालुक्यातील भुसावल (Bhusawal) पासून जवळच असलेल्या गोजोरा येथे विनोद गंभीर कोळी या तरुणाला चार -पाच जणांनी शेतात बोलावून बेदम मारहाण केली त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली, ही घटना शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास घडली.
दोन दिवसापूर्वी गावातील काही संशयतांनी विनोदला मारहाण केली होती त्या नंतर शुक्रवारी दुपारच्या वेळी विनोद एकटाच असल्याचे पाहून त्याला संशयित आरोपींनी शेतात बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला भुसावळ ट्रॉमा सेंटर नंतर तेथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पाटील यांनी विनोद गंभीर कोळी वय २७ वर्ष , रा. गोजोरा, ता. भुसावळ.या तरूणाला मयत घोषित केले.
घटनास्थळी भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात इंगळे, तालुक्याचे पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांच्यासह अधिकार्यांनी गोजोरा येथे धाव घेत खून प्रकरणी तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असून भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेला
विनोद कोळी हा तरुण आई, वडील, दोन भावांसह वास्तव्याला होता.