क्राईमभुसावळ

भुसावळ येथील तरुणाची सुरतच्या तरुणांकडून हत्या, भुसावळ शहरात खळबळ

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरातील नारायण नगर येथील रहिवासी धीरज अरूण जाधव वय ३२ वर्ष हा तरुण मित्रांसोबत दिव दमण येथे फिरायला गेला असता अंडा भुर्जी च्या गाडीवर एका सुरतच्या तरुणाशी त्याचा वाद झाला. या वादातून सुरतच्या तरुणाने धीरज जाधव या तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना दि. ३ एप्रिल रोजी रात्री ९.४५ वाजता घडली .

मिळालेली अधिक माहिती अशी की, भुसावळ येथील धीरज अरुण जाधव रा. नारायण नगर, हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत दिव दमण येथे फिरायला गेले असता एका अंडा भुर्जीच्या गाडीवर उभे असताना सुरतच्या एका तरुणांसोबत त्याचा वाद झाला. वाद इतका विकोपाला पोहचला की या वादातून सदर तरुणाने धीरज जाधव याच्या मानेवर चाकूने वार केला.त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.हा तरुण पुण्यात अभियंता होता व त्याचे वडील अरूण जाधव हे सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार आहेत

या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली असून धीरज जाधव याच्यावर शुक्रवारी दि. ५ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.. या बाबत तेथील पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!