भुसावळ तालुकास्तरीय जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धेला प्रारंभ
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली.आज बॅडमिंटन या क्रीडा स्पर्धेच उद्घाटन ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे पंचायत समिती कक्ष अधिकारी सचिन पाठक आणि शिक्षण विस्तार अधिकारी प्रधान तुषार प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी फोन करून सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक उपशिक्षक रवी पठार, द्वितीय क्रमांक कृषी अधिकारी कपिल सुरवाडे, तृतीय क्रमांक उपशिक्षक सूर्यकांत घुले यांचा आला. तर महिलांच्या बॅटमिंटन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गीता राजपूत, द्वितीय क्रमांक मीना दुपारे, आणि तृतीय क्रमांक मनीषा घुले यांचा आला.
या बॅडमिंटन स्पर्धेचा परीक्षण विजय संकट यांनी केले.तर या स्पर्धेला कृषी अधिकारी कपिल सुरवाडे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षक क्रीडा संघटनेचे प्रदीप साखरे आणि पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.