भुसावळराजकीय

वरणगाव व परिसरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह २०० कार्यकर्त्यांचा राजीनामा, रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध करत भारतीय जनता पक्षाच्या भुसावळ तालुक्यातील वरणगावसह परिसरातील दोनशे पदाधिकार्‍यांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने पहिल्या दिवसापासून रावेर मतदार संघात तीव्र पडसाद उमटले. यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमधील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याला विरोध करत राजीनामे दिले. लागलीच राजीनामा लोण भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगरातही पोहचले. यानंतर आता वरणगाव व परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते बूथ प्रमुख व सुपर वारियार मिळून अशा २०० लोकांनी रविवारी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जिल्हाध्यक्ष आमोल जावळे यांच्याकडे पाठविले आहेत.तसेच खासदार रक्षा खडसे या भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्त मदत करतात. तसेच त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडून भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही खालच्या पातळीवर टीका करण्यात आली असता रक्षा खडसे यांनी कुठलाही शब्द ना काढता राष्ट्रवादीला विरोध केला नाही. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी सामूहिक राजीनामा देणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी केली आहे..

यात माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे, यासोबत, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, ओबीसी शहराध्यक्ष गोलू राणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष आकाश निमकर, शहराध्यक्ष सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष माला मेढे, शामराव धनगर, महिला शहर अध्यक्ष प्रणिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस डॉ . सादिक शेख, जिल्हा उपाध्यक्ष हजी फायुम, तालुका अध्यक्ष साबीर कुरेशी तालुका सरचिटणीस रमेश पालवे, नाना चुधरी, हितेश चौधरी, सुशीलकुमार झोपे, शेतकी संघ संचालक सुशील झोपे विविध कार्यकारी संचालक अनिल वंजारी, गुड्डू बढे, कायदे आघाडी सरचिटणीस ऍड. ए.जी. जंजाळे यांचा समावेश असून यांच्यासह २०० जणांचा समावेश असल्याची माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!