भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

सावदा परिसरातील अवैध गो-वंशाची तस्करी रोखण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षकांसमोर मोठे आव्हान, वसुली अधिकाऱ्याना आळा बसून तस्करी थांबणार का ?

सावदा, मंडे टू मंडे न्युज चमू | रावेर तालुक्यातसह सावदा परिसरात मध्यरात्री मोठ्या प्रमाणात गो-वंशाची तस्करी सुरु असून मध्यप्रदेश मधुन रावेर मार्गे सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही गो तस्कारी सर्रास सुरू आहे. या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यामध्ये सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. नव्याने रुजू झालेले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या पुढें गो तस्करी व अवैध धंदे रोखण्याचे मोठें आव्हान उभे ठाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गो तस्करांकडून दरमहा लाखो रुपयांची वसुली पोलीस प्रशासनातील काही वसुली अधिकारी करत असल्यानेच गाय, बैल, म्हशीं अश्या जनावरांची अवैध वाहतूक परीसरात मोठ्या प्रमाणावर सुरु असून एकंदरीत. परिसराती अवैध धंदे व गो तस्करी पोलीस प्रशासनाच्याच आशीर्वादाने बिनदिक्कत चालू आहेत. गो तस्करी होत आहे ही माहिती गो रक्षकाना मिळते पण पोलीसांना मिळत नाही यामुळें रात्री गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचारी यांच्या प्रतिमेवर भले मोठे प्रश्न चिन्ह? उपस्थित केले जात आहे.

राज्यात गो तस्करीला बंदी असताना अत्यंत निर्दयीपणे तसेच निर्भयतेने दाटीवाटीने कोंबून प्राणी वाहतूकिचा कुठलाही परवाना नसताना अवैधरित्या गो वंशाची वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रक दिवसाआड मध्यरात्री मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरून रावेर व पाल मार्गे सावदा पोलीस स्टेशन हद्दीतून पोलीसांच्या परवानगीने पास केल्या जातात. यात विशेष म्हणजे या जनावर तस्करांकडून दरमहा लाखो रुपयांची वसुली केली जात असल्यानेच पोलीस दादा कारवाई करत नाही. गो तस्करांपुढे पोलीस प्रशासन हतबल झाले आहे की काय असा प्रश्न गो प्रेमी विचारत आहे.

सावदा पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या पुढें हे गो वंशाची तस्करी रोखण्याचे मोठें आव्हान पोलिस प्रशासना समोर आहे. या प्रकरणात नूतन पोलीस अधिकारी कायमचे तस्करी बंद करतात का की याकडे कानाडोळा करत वसुली अधिकाऱ्यांना सुट देतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!