महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ शेतकऱ्यांना रेशन ऐवजी थेट मिळणार पैसे

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पारंपारिक राशन धान्य देण्याऐवजी, आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रोख रक्कम जमा केली जाणार आहे.
रेशनकार्डधारक शेतकऱ्यांसाठी अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेस मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत मिळणार आहे.

ही योजना जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. आरंभीची रक्कम दरमहा १५० रुपये प्रति लाभार्थी होती. आता सुधारित रक्कम २० जून २०२४ पासून दरमहा १७० रुपये प्रति लाभार्थी अशी करण्यात आली आहे.

हे १४ जिल्हे आहेत या योजनेत
बीड, बुलढाणा, वर्धा, अमरावती, परभणी, नांदेड, अकोला, वाशिम, हिंगोली, औरंगाबाद, जालना, लातूर, यवतमाळ आणि उस्मानाबाद. या जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी रेशनकार्डधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. या रकमेचा थेट हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना ही योजना लागू आहे.
महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात हा लाभ मिळेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!