दुःखद घटना : महाकुंभ मेळ्यात मस्कावद येथील भाविकांचा हृदयविकाराने मृत्यू
सावदा, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तालुक्यातील मस्कावद येथील रहिवाशी जगन्नाथ रावजी इंगळे हे पत्नी व. मित्रांसह प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात गेले असता तेथे त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला असून त्यांचे पार्थिव मस्कावद येथे रवाना करण्यात आले आहे.
रावेर तालुक्यातील मस्कावद येथील रहिवाशी जगन्नाथ रावजी इंगळे हे आपल्या सौभाग्यवतींसह व मित्रांसोबत
प्रयागराज येथे गेले होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. मात्र आज दुपारी त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
त्यांचे पार्थिव गावाकडे रवाना करण्यात आले असून
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी या कामी मदत केली. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी आणि दिवंगत जगन्नाथ इंगळे यांचे मित्र अरूण फेगडे व महेंद्र इंगळे हेही सोबत निघाले आहेत.
