मोठी बातमी : खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ,तिकडे आयात शुल्कात वाढ करण्याचे जाहीर करताच इकडे तेलाच्या दरात वाढ
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भारत सरकारने क्रूड आणि रिफाइंड सूर्यफूल तेलावरील सीमाशुल्क वाढवून अनुक्रमे २०% आणि ३२.५ % करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने जाहीर केले की क्रूड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क शून्य वरून २०% पर्यंत वाढवले आहे. याव्यतिरिक्त, रिफाइंड पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलांवरील मूलभूत सीमा शुल्क १२.५% वरून ३२.५% करण्यात आले आहे. शासनाने सीमा शुल्क वाढविल्याने तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. शासनाने शुल्कात वाढ करण्याचे जाहीर करताच इकडे व्यापारी, दुकानदारांनी तेलाच्या किमतीत मोठी वाढ केली. या मुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत असून विशेषत: गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेट मात्र बिघडले आहे.
केंद्र शासनाने खाद्य तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याचे जाहीर करताच लागलीच त्याच वेळी व्यापाऱ्यांनी दुकानावर किरकोळ विक्री च्या दरात मोठी वाढ केली. ऐन सणासुदीच्या काळात खाद्य तेल महागल्याने ग्राहकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
अर्थ मंत्रालयाकडून एक अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार, क्रुड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यांवर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. क्रुड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रुड सनफ्लॉवर सीड ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटीचे दर आत्तापर्यंत शून्य होती. म्हणजेच या तेलांवरील आयात शुल्क लागत नव्हते. आता हेच आयात शुल्क वाढून २० टक्के करण्यात आली आहे. तर, रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल, रिफाइंड सोयाबीन तेलांवर बेसिक ड्युटीचे दर वाढवून ३२.५ टक्के करण्यात आली आहे.
सध्या गणेश उत्सव जोरात सुरु आहे, त्यानंतर पितृ पंधरवडा, त्या नंतर नवरात्र उत्सव आणि त्यानंतर दिवाळी – दसरा अशा ऐन सणासुदीच्या काळाच्या अगोदरच खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे तर गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे हे मात्र निश्चित…