महाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! ९ पैकी ६ खासदार करणार “जय महाराष्ट्र”?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. काही आठवड्यांपूर्वीच ठाकरेंना पुन्हा हादरा बसण्याचे संकेत दिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेश टायगर सक्सेसफुल झाल्याचं बोललं जातं आहे. ठाकरे गटाच्या सहा खासदारांचे मन वळवण्यात शिंदे गटाला यश आले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिंदे गट पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये असल्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे या खासदारांचे तळ्यात मळ्यात सुरू होतं. या कायद्यातून वाचण्यासाठी ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार फुटणं आवश्यक होतं.

केंद्रात एनडीए ची तर राज्यात महायुतीची सत्ता आहे. पुढील ५ वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता…आहे. …प्रामुख्याने निधी मिळवण्यासाठी अडचण…केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सरकार महायुतीचं असल्याने त्याचा फायदा होणार आहे. तसेच केंद्रात भाजपची साथ असल्याने विकास कामांना गती मिळण्यास मदत…सोबतच, निधी मिळण्यास अडचणी नाहीत. या कारणाने ठाकरे गटाची साथ खासदार सोडू शकतात?

ठाकरेंचे नऊ खासदार कोण?
संजय देशमुख (यवतमाळ वाशिम)
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
संजय जाधव (परभणी)
राजाभाऊ वाजे (नाशिक)
संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई)
अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई)
अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)
भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद)

ठाकरे शिवसेना गटाचे काही आमदारही संपर्कात-
सहा खासदार शिंदे गटात जाण्यास तयार असून लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जातंय. सोबतच, ठाकरे गटाचे काही आमदार देखील संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, आमदारां बाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती आहे…

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!