भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

जागतिक डेंग्यू दिवस निमित्त बलवाड़ी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

बलवाड़ी, ता .रावेर.मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | जागतिक डेंग्यू दिवस दरवर्षी १६ मे रोजी सर्वत्र साजरा केला जातो यामध्ये डेंगू आजाराबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यापासून बचावासाठी विविध उपाययोजना करण्याच्या उद्देशाने प्रा. आ.केंद्र- निंभोरा बु. तालुका रावेर अंतर्गत बलवाडी उपकेंद्र येथे विविध उपक्रमांद्वारे डेंगू दिवस साजरा करण्यात आला

उपकेंद्र बलवाडी येथे मुख्य चौकांमध्ये व ग्रामपंचायतींच्या आवारात जनतेला आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे व संडासच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवणे, गटारी वाहत्या करणे, जुने टायर्स, जुने माठ,फुटकी भांडी ज्यात पावसाचे पाणी साचते अशी निरुपयोगी भांडी नष्ट करणे जेणेकरून डेंगूचे डास निर्माण होणार नाही व डेंगू आजाराची लागण होणार नाही,याबद्दल आरोग्य शिक्षण जनतेला अवगत व्हावे म्हणून गावागावात गटसभा आयोजित केल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय डॉ. प्रमोद सोनवणे. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल भंगाळे. वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय रिंढे. डॉ.निरज पाटील. श्री विजय नेमाडे. ( तालुका पर्यवेक्षक रावेर) डॉ.महेद्र अजलसोंडे व श्री आर. के. पाटील. (एल एस ओ ) आरोग्य सहाय्यक श्री. व्ही.एस. जबडे व श्री बी. व्ही. इंगळे. श्री. हिरालाल तायडे आरोग्य सेवक. तसेच आशाताई, मदतनिस व प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!