निकालापूर्वीच १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली नाही. मात्र पुढच्या १५ दिवसात निकाल जाहीर होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण त्या पूर्वी महाराष्ट्र बोर्डा कडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे.
दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय आणि धावपळ टाळण्यासाठी यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून या बाबत एक प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र बोर्डाने जारी केलं आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइनच होणार असून प्रवेश प्रक्रियेसाठी फक्त शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा, या संदर्भात बोर्डाने विद्यार्थी आणि पालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे.
या संकेतस्थळावरून करा नोंदणी!
अकरावी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ Mahafyjcadmissions.in याचा वापर पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा असं आवाहन महाराष्ट्र बोर्डाने केला आहे.