भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

मोठी बातमी : राज्यातील घटनांबाबत देवेंद्र फडणवीसांचा अमित शहांना फोन, केंद्रीय गृहमंत्रालय कठोर पाऊलं उचलणार?

मुंबई, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : महाराष्ट्रात ठाकरे सरकारकडून भाजप नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप करत भाजपच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शिवसैनिकांनी घातलेला घेराव, तसंच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेला हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Devendra Fadanvis) यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडल्यात. भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर सोमय्या यांच्यावरही हल्ला करण्यात आला. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यामुळं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप भाजपचे नेते करत आहेत. यामुळं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप भाजपचे नेते करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा इशारा देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शिवसैनिकांनी घातलेला घेराव, तसंच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर झालेला हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींबाबत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये काल (रविवारी) चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांना हाताशी धरून राज्य सरकार भाजप नेत्यांवर हल्ले करत असल्याचं यावेळी फडणवीस यांच्याकडून गृहमंत्र्यांना सांगण्यात आल्याचं समजते. या संभाषणाचा सविस्तर तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. मात्र किरीट सोमय्या यांनीही दिल्लीत पत्रकारांशी बोलताना या दोन नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.

एकीकडे, फडणवीस-शहा यांच्यामध्ये खलबतं झालेली असतानाच आज किरीट सोमय्या यांच्यासह राज्यातील भाजपचे विविध नेते दिल्लीत दाखल झाल्याने केंद्रीय पातळीवरून महाराष्ट्रातील घटनांबाबत हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध मोदी सरकार असा संघर्ष रंगणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!