क्राईमधरणगाव

धक्कादायक ७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

धरणगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। धरणगाव तालुक्यातील पिंप्री खु येथून ७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दि. २१ एप्रिल २०२२ रोजी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खु येथून माझी बहीण बबली (नाव बदलेले) (वय ७) हिस कोणीतरी अज्ञात इसमाने पळवुन नेली अशी तक्रार मुलीच्या भावाने धरणगाव पोलिसस्टेशनला दिली.याप्रकरणी धरणगाव पोलीस पोलिसस्टेशनला भा. द. वि कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पलिसांनी अल्पवयीन मुलगी व संशयित आरोपींच्या शोधार्थ मध्यप्रदेशसह आदी विविध भागात पथक रवाना केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल गुंजाळ करीत हे आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!