प्रेमप्रकरणातून ग्रामपंचायत सदस्याचा खून,नऊ आरोपीना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बोदवड, मंडे टू मंडे वृत्तसेवा। बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील ग्रामपंचायत सदस्याचा प्रेम संबंधातून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता असून या प्रकरणी एकच कुटुंबतील नऊ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ११मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथील ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गोकुळ पारधी वय २९ यांना गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. नंतर त्यांचा मृतदेह बोदवड शिवारातील मलकापूर रोडवरील पुलाखाली फेकून दिला.शिवाजी पाळधी हे काही दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत ६ मार्चला रात्री त्यांचे भाऊ सुनील गोकुळ पारधी यांनी बोदवड पोलिसांत मिसिंगची नोंद ही केली होती .
रविवारी रात्री बोदवड शिवारातील मलकापूर रोडवरील पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्या मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवली असता तो मृतदेह शिवाजी पारधी यांचाच असल्याचे समोर आले . हा खून प्रेम प्रकरणातुन झाला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून मृत शिवाजी पराधे याचे एका विवाहित तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी मुक्तळ येथील रविना उर्फ धनश्री सचिन कोल्हे ,वय २१, सचिन श्रीधर कोल्हे ,वय ३२, अमोल श्रीधर कोल्हे,वय ३०,श्रीधर रामधन कोल्हे,वय ५९,निर्मलाबाई श्रीधर कोल्हे,वय ५०, नितीन भास्कर कोल्हे,वय ३२, , सर्व रा.मुक्तळ तसेच पुंडलिक यशवंत वारके ,वय ४९, व पल्लवी पुंडलिक वारके,वय ३६, रा. शिंदी ता.भुसावळ आदींचा समावेश असून या प्रकरणी सुनील गोकुळ पारधी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.