बोदवळसामाजिक

रेल्वेच्या थांब्यासाठी दिव्यांग चे रेल रोको, नवीन काही नको आमच्या हक्काच्या गाड्या थांबवा

बोदवड,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रेल्वे बोर्ड एकीकडे आधुनिकतेची कास धरत असून दुसरीकडे ग्रामीण भागातील नागरिकांवर अन्याय करत आहे, एकी कडे भुसावळ विभाग विभागाच्या पंधरा रेल्वे स्थानक चा कायापालट करत आहे, त्यात बोदवड रेल्वे स्थानक ला वगळले असून त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे,

बोदवड तालुक्यावर रेल्वे बोर्ड सतत अन्याय करत असून आधी ब्रिटिशकालीन व राष्ट्रपती च्या हस्ते सुरू झालेल्या गाड्यांचा थांबा कोरोना काळ पासून बंद करून तर आता स्थानक च्या मॉडेल मधून नाव वगळून अन्याय केला जात आहे, याबाबत राष्ट्रीय दिव्यांग पार्टी ने नऊ ऑगस्ट क्रांती दिनी तालुक्यातील दिव्यांग बांधव बोदवड रेल्वे स्थानक वर पूर्वी ब्रिटिशकसलीन सुरू असलेली १) दादर सेवाग्राम, सेवाग्राम दादर,माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुरू केलेली २)अमरावती सुरत व ३)सुरत अमरावती ह्या दोन्ही गाड्यांचे थांबे बोदवड ला पुन्हा सुरू करावे यासाठी रेल रोको आंदोलन करत असून यासाठी दिव्यांग पार्टी चे प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड यांनी भुसावळ विभागीय व्यवस्थापक व बोदवड स्टेशन उप प्रबंधक यांना निवेदन दिले आहे, त्यांच्या या कार्याला शहरातील प्रवासी संघटना, तसेच व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे,

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!