क्राईमबोदवळ

पुरवठा विभागाचा लिपिक एसीबी च्या जाळ्यात, एक हजाराची लाच भोवली

बोदवड , मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रेशनकार्ड वर आईचे व मुलाचे नाव कमी करण्यासाठी एक हजाराची लाच मागणाऱ्या पुरवठा विभागाचा लिपीक उमेश दाते याला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडला , या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील तक्रारदार यांच्या रेशनकार्डवर आईचे व मुलाचे नाव कमी करून नवीन रेशनकार्ड करण्यासाठी बोदवड तहसिल कार्यालयात अर्ज केला होता. हे काम करण्यासाठी पुरवठा विभागाचे लिपिक उमेश बळीराम दाते, वय-५५ वर्ष , रा. बोदवड, जि.जळगाव याने १ हजार रुपयांची मागणी केली, त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली, लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. १ हजार रुपयांची मागणी केल्यानंतर बोदवड तहसिल कार्यालय येथे स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख,पोलीस उप निरीक्षक अमोल वालझाडे,दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे,राकेश दुसाने आदीं होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!