बोगस दिव्यांग प्रमाणपत्र : जळगाव जिल्हा परिषदेचे आणखी ६ कर्मचारी निलंबित,शिक्षण व आरोग्य विभागात खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | दिव्यांगांच्या प्रमाणपत्राची तपासणी मोहिमेने जळगाव जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे. दिव्यांगत्वाच्या निकषात बसत नसतानाही बनावट दिव्यांग प्रमाणपत्र करून सवलती लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासणी मोहिमेत टक्केवारीत मोठी तफावत आढळून आल्याने आज दिनाक २३ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा परिषदेच्या ६ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी तडकाफडकी निलंबित केले. या धडक कारवाईत आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १९ वर पोहोचली असून जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे
राज्य शासनाच्या दिव्यांग समक्षीकरण कल्याण विभागाच्या आदेशानुसार, सध्या राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचारी आणि व्यक्तींच्या ‘युडीआयडी’ कार्डची सखोल तपासणी सुरू आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता, अनेक कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाच्या टक्केवारीत आणि प्रत्यक्ष स्थितीत मोठी तफावत असल्याचे समोर आले. याच कारणास्तव प्रशासनाने कठोर पाऊल उचलत निलंबनाचा बडगा उगारला आहे.
यापूर्वी १३ कर्मचाऱ्यांवर अशीच कारवाई झाली होती. आजच्या ६ जणांच्या निलंबनामुळे प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आणण्यासाठी मोहीम अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
आज निलंबित झालेले ‘ते’ सहा कर्मचारी
१. राजेश विजय खैरनार (आरोग्य सहाय्यक, ता. आरोग्य अधिकारी कार्यालय, रावेर)
२. प्रदीप बगडू ढाके (आरोग्य सहाय्यक, प्रा. आ. केंद्र सोनवद, ता. धरणगाव)
३. अजय पुंडलिक शिरसाठ (प्राथमिक शिक्षक, जि. प. शाळा आव्हाने)
४. ज्ञानेश्वर वेडू चौधरी (प्राथमिक शिक्षक, जि. प. शाळा सुनोदा)
५. स्वप्नाली वाल्मिक पाटील (प्राथमिक शिक्षक, जि. प. शाळा पथराड, ता. धरणगाव)
६. पंकजा मगनलाल वाघ (प्राथमिक शिक्षक, जि. प. शाळा नगाव, ता. पारोळा)
“दिव्यांगत्वाच्या नावाखाली चुकीचे लाभघेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तपासणी मोहीम सुरूच राहणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
…मीनल करणवाल, सीईओ, जिल्हा परिषद जळगाव
यापूर्वी
१)भास्कर रामदास चिमणकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यावल,
२)विनोद शांताराम बोधरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती चोपडा,
३)शांताराम उखरडू तायडे, वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती यावल,
४)दिनेश लक्ष्मण नन्नवरे कनिष्ठ सहाय्यक ग्रामपंचायत विभाग, पारसमणी
५)काशीराम मोरे, कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती अमळनेर
६) भालचंद्र नारायण पवार, आरोग्य सहाय्यक जिल्हा प्रशिक्षण केंद्र जळगाव,
७)छाया घनश्याम भोळे, आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोड,
८)संदीप विनायक सोनवणे, आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र तरवडे ता. चाळीसगाव
९) गणेश मुरलीधर महाजन, आरोग्य सहाय्यक पिंपरखेड ता. भडगाव,
१०)चाळीसगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी नारायण सुकदेव मोरे
११)पाचोरा पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लेखा विक्रम सुरेश पाटील
१२) धरणगाव पंचायत समितीत कार्यरत कनिष्ठ सहाय्यक लेखा संतोष लक्ष्मण पाटील
१३) ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग बोदवडचे वरिष्ठ सहाय्यक शंकर वसंतराव वाघमारे
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
