भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : माजी उपसरपंचाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या, मारेकरी फरार, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l किरकोळ वादातून एका ३६ वर्षीय माजी उपसरपंच तरुणाची छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता जळगाव तालुक्यातील भादली या गावात घडली. अज्ञात तीन जणांनी चाकू आणि चॉपरने वार करून हत्या केल्याच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

युवराज सोपान कोळी.वय ३५ वर्ष. रा. कानसवाडा ता. जळगाव. याचा गुरुवारी रात्री काहींसोबत वाद झाला होता. या वादातून अज्ञात तीन जणांनी चाकू आणि चॉपरने वार करून त्याची हत्या करण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या समोर ही घटना घडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. युवराज याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून युवराज यांना मयत घोषित केले.

यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी करत आक्रोश केला होता. मयत हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. युवराज सोपान कोळी हा आई वडील, तीन मुलं, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होता. .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!