भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

ब्रेकिंग : मुक्ताईनगर हादरले…..प्रेम प्रकरणातून चाकूने वार करून तरुणाची हत्या

मुक्ताईनगर,मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मध्ये २४ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही हत्या प्रेम प्रकरणातून घडल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना हत्या झाल्यामुळे मुक्ताईनगर मध्ये मोठी खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे?

मुक्ताईनगर शहरात रविवारी २३ नोव्हेंबर सायंकाळच्या सुमारास शहरातील हॉटेल वृंदावन समोरील प्लॉटिंग भागात एका मोकळ्या जागेत विष्णू गोसावी वय २६ रा . मुक्ताईनगर या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर तरुणाची चाकू ने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

विष्णू गोसावी हा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना प्लॉटिंगच्या ठिकाणी हा मृतदेह दिसला, त्यानंतर त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही तरुणांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा किंवा सूडाचा संबंध असल्याचे डी वाय एस पी सुभाष ढवळे यांनी  सांगितले . तसेच आरोपी ऋषिकेश आत्माराम पवार (धनगर) वय २४ वर्ष, आकाश आत्माराम पवार (धनगर) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, विष्णू गोसावी याचे कोणासोबत प्रेमसंबंध होते आणि तो बेपत्ता झाल्यानंतर कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता, याची कसून चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून, या गूढ खुनामागील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!