Breaking : नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ED कोठडी : अडचणीत वाढ !
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मलिक यांच्या अडचणी वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने मलिक यांना 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. पहाटेच ईडीची टीम नवाब मलिक यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर सकाळी सातवाजेपासून चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास अटक केली. अटक केल्यानंतर मलिक यांना वैद्यकीय चाचणी करण्यासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर मलिक यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या 54 नंबरच्या कोर्टात नवाब मलिकांना हजर करण्यात आले होते. ईडीतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग युक्तिवाद केला.
दाऊद इब्राहिम हा जैश ये मोहम्मद सोबत काम करतो. दाऊदची बहिण दाऊदचा कारभार सांभाळत होती. कुर्ला गोलीवाला कंपाऊंड हसीना पारकरने मारियामकडून घेतले होते. दाऊदची बहीण हसिना पारकर हिचे निधन झाले आहे, ती या सर्व कामांवर नियंत्रण ठेवत असे. अनेक मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांनी निधी उभारला आहे. कुर्ल्यातील गोवाले कंपाऊंडमधील मालमत्ताही हसीनाने जप्त केली आहे. मुनिरा आणि मरियम या दोघीया मालमत्तेच्या खऱ्या मालक आहेत. ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता होती, ती दोघांच्या मालकीची होती, त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत, असा युक्तीवाद सिंग यांनी केला.
विशेष म्हणजे, गोवा कंपाऊंड ही तीच जमीन आहे ज्यावर नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. हे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ‘मुनिरा आणि तिची बहीण त्या जमिनीचे मूळ मालक आहेत.माध्यमातून त्यांना कळलं की त्यांच्या जमिनीची नवाब मलिक यांच्याशी संबंधित कंपनीला विक्री झाली. मग मुनिरा आणि तिच्या बहिणीने ईडीला कळवलं की ही विक्री बेकायदेशीर झाली आहे. सलीम पटेलने बेकायदेशीर ही जमीन विक्री केली. जमीन स्वतःची असूनही एक रुपयाही आम्हाला मिळाला नाही असं मुनिरा आणि तिच्या बहिणीने ईडीला सांगितलंय. दोघींचे जबाब ईडीने नोंदवले आहेत, असा युक्तिवाद सिंग यांनी केला.