एरंडोलक्राईमजळगाव

ट्रक आणि कारचा भीषण अपघात : ४ जण जागीच ठार, १ गंभीर जखमी !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे रात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्यामुळे अपघातात चार जण जागीच ठार झाल्याचे दुर्दैवी घटना घडली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की या ट्रकमध्ये कार जाऊन आदळली. त्यामुळे कार चक्काचूर झाली आहे.

एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंपळकोठा येथे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला. पिंपळकोठा प्रवासी बस थांब्यानजिक एमएच १८ एए ८८६७ हा ट्रक उभा होता. ८ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एम. एच.१९ सी.झेड ७३६० या क्रमांकाच्या इंडीका कारने धडक दिली. कारचा यात चुराडा झाला. कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते. क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून काढण्यात आली. जखमी झालेल्या व्यक्तीला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. मृतांमध्ये ३ जण चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली तर १ जण भडगाव तालुक्यातील वडजी गावचे आहे.

या अपघातात कारमधील चतरसिंग पद्मसिंह परदेशी (चालक), विजयसिंग हरी परदेशी, जयदिप मदनसिंग परदेशी, आबा रामचंद्र पाटील (वडजी, भडगाव) हे जागीच ठार झाले तर त्यांचा सहकारी रायसिंग पदमसिंह राजपूत -(वय ३७) हा बचावला सदर इसम हा जामडी(चाळीसगाव) येथील पोलीस पाटील असल्याची माहिती आहे. या अपघातामुळे दोन्ही कडील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती. पोलीस हेड काँन्स्टेबल काशिनाथ पाटील,अनिल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी वाहतूक सुरळीत केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!